डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखी महान विभूती ही क्वचितच जन्माला येते. अनिरुद्ध कांबळे.

 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखी महान विभूती ही क्वचितच जन्माला येते. अनिरुद्ध कांबळे.

संपूर्ण जिल्हाभरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहातभारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अनिरुद्ध कांबळे बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवाला सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. वर्णद्वेषी समाजातून समानतेचा संदेश देत त्यांनी मानवाला मानवाप्रमाणे जागविण्याचा नारा दिला. आज बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच मला जिल्हा परिषदेच्या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवनपटाबद्दल  बद्दल बोलायचे असेल तर काही तासांच्या भाषणात ते शक्य नाही. महिलांच्या अधिकारा बद्दलसुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता. जातीय समानते बरोबरच सामाजिक समानतेसाठी त्यांनी कार्य केले आहे असे यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील म्हणाल्या.

यावेळी वसतीगृहातील प्रातिनिधिक स्वरूपात 13 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी सुहास गुरव यांनी केले तर आभार प्रदर्शन चंचल पाटील यांनी मानले.

सभापती समाज कल्याण संगीता धांडोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा कोळी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरळे. शिक्षणाधिकारी माध्यमिक भास्करराव बाबर, शुभांगी अनिरुद्ध कांबळे, संगम धांडोरे, सांख्यिकी अधिकारी दत्तात्रय कवितके व विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

पंढरपूर पंचायत समितीच्या सभागृहात महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिना निमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आले. या प्रसंगी सभापती अर्चना व्हरगर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप सभापती राजश्री भोसले, सदस्य घोलप, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, कार्यकारी अभियंता जलसंधारण पंडीत भोसले, उप अभियंता एस एन लवटे , उप अभियंता पांडव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.

--------------------------------------

◾ जनता संघर्ष न्यूज,पुणे

✍️ संपादक-रामभाऊ इंगळे

 ✍️   कार्यकारी संपादक-सिद्धार्थ भडकुंबे

बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

सोलापूर येथील विजापूर रोड पारधी वसाहतीमध्ये कोरोना लसीकरण मोहिम संपन्न...!