सोलापूर येथील विजापूर रोड पारधी वसाहतीमध्ये कोरोना लसीकरण मोहिम संपन्न...!
सोलापूर येथील विजापूर रोड पारधी वसाहतीमध्ये कोरोना लसीकरण मोहिम संपन्न...!
प्रतिनिधी-सोलापूर
सोलापूर महानगरपालिका रामवाडी नागरी आरोग्य केंद्र,परिवर्तन अकादमी पारधी समाज परिवर्तन संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने विजापूर रोड येथील उमेद हौसिंग सोसायटी पारधी वसाहतीमध्ये पारधी समाजातील 140 स्त्री-पुरुषांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. रामवाडी यु.पी.एच.सी सेंटर चे मेडिकल ऑफिसर डॉक्टर सौ.स्वरांजली पवार, डॉ.लता रणखांबे,ए.एन.एम विजय कांबळे ,रेखा गायकवाड, पूनम जाधव, विमल शिंदे ,पूजा रोकडे ,अश्विनी जाधव, रेश्मा रोकडे ,अश्विनी काळे, व वीर ठाकूर यांनी लसीकरण केले. तसेच येथील नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात आले.यावेळी परिवर्तन अकादमीचे यशवंत फडतरे,पारधी समाज परिवर्तन संस्थेचे विमल काळे, व केंद्रीय निवासी विद्यालय डोणगावचे मीनाक्षी गायकवाड ,क्रांती फडतरे- आठवले, जगन्नाथ काळे,गणेश भगवत, प्रवीण शिंदे, केवल फडतरे आदी उपस्थित होते.-------------------------------------
◾जनता संघर्ष न्यूज,पुणेकार्यकारी संपादक-सिद्धार्थ भडकुंबे.
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240
Comments
Post a Comment