डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखी महान विभूती ही क्वचितच जन्माला येते. अनिरुद्ध कांबळे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखी महान विभूती ही क्वचितच जन्माला येते. अनिरुद्ध कांबळे. संपूर्ण जिल्हाभरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहातभारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अनिरुद्ध कांबळे बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवाला सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. वर्णद्वेषी समाजातून समानतेचा संदेश देत त्यांनी मानवाला मानवाप्रमाणे जागविण्याचा नारा दिला. आज बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच मला जिल्हा परिषदेच्या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवनपटाबद्दल बद्दल बोलायचे असेल तर काही तासांच्या भाषणात ते शक्य नाही. महिलांच्या अधिकारा बद्दलसुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता. जातीय समानते बरोबरच सामाजिक समानतेसाठी त्यांनी कार्य केले आहे असे यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील म्हणाल्या. यावेळी वसतीगृहातील प्रातिनिधिक स्वरूपात 13 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले...