Posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखी महान विभूती ही क्वचितच जन्माला येते. अनिरुद्ध कांबळे.

Image
 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखी महान विभूती ही क्वचितच जन्माला येते. अनिरुद्ध कांबळे. संपूर्ण जिल्हाभरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहातभारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अनिरुद्ध कांबळे बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवाला सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. वर्णद्वेषी समाजातून समानतेचा संदेश देत त्यांनी मानवाला मानवाप्रमाणे जागविण्याचा नारा दिला. आज बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच मला जिल्हा परिषदेच्या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवनपटाबद्दल  बद्दल बोलायचे असेल तर काही तासांच्या भाषणात ते शक्य नाही. महिलांच्या अधिकारा बद्दलसुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता. जातीय समानते बरोबरच सामाजिक समानतेसाठी त्यांनी कार्य केले आहे असे यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील म्हणाल्या. यावेळी वसतीगृहातील प्रातिनिधिक स्वरूपात 13 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले...

सोलापूर येथील विजापूर रोड पारधी वसाहतीमध्ये कोरोना लसीकरण मोहिम संपन्न...!

Image
सोलापूर येथील विजापूर रोड पारधी वसाहतीमध्ये कोरोना लसीकरण मोहिम संपन्न...! प्रतिनिधी-सोलापूर सोलापूर महानगरपालिका रामवाडी नागरी आरोग्य केंद्र,परिवर्तन अकादमी पारधी समाज परिवर्तन संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने विजापूर रोड येथील उमेद हौसिंग सोसायटी पारधी वसाहतीमध्ये पारधी समाजातील 140 स्त्री-पुरुषांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. रामवाडी यु.पी.एच.सी सेंटर चे मेडिकल ऑफिसर डॉक्टर सौ.स्वरांजली पवार, डॉ.लता रणखांबे,ए.एन.एम विजय कांबळे ,रेखा गायकवाड, पूनम जाधव, विमल शिंदे ,पूजा रोकडे ,अश्विनी जाधव, रेश्मा रोकडे ,अश्विनी काळे, व वीर ठाकूर यांनी लसीकरण केले.  तसेच येथील नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार  देण्यात आले.यावेळी परिवर्तन अकादमीचे यशवंत फडतरे,पारधी समाज परिवर्तन संस्थेचे विमल काळे, व केंद्रीय निवासी विद्यालय डोणगावचे मीनाक्षी गायकवाड ,क्रांती फडतरे- आठवले, जगन्नाथ काळे,गणेश भगवत, प्रवीण शिंदे, केवल फडतरे आदी उपस्थित होते. ------------------------------------- ◾ जनता संघर्ष न्यूज,पुणे कार्यकारी संपादक-सिद्धार्थ भडकुंबे. बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-957983...

एन.ए.बी निवासी अंध कार्यशाळा,सोलापूरमध्ये संविधान दिन साजरा.

Image
एन.ए.बी निवासी अंध कार्यशाळा,सोलापूरमध्ये संविधान दिन साजरा करताना सर्व  शिक्षक वृंद व कर्मचारी... (प्रतिनिधी-सोलापूर) नॅब संचलित  एन.ए.बी निवासी अंधकार्यशाळा येथे संविधान दिन करण्यात आला. तसेच २६/११च्या भ्याड मुंबई हल्लात शहीद झालेल्या आपल्या सर्व जवानांना  आदरांजली वाहण्यात आली. भारतीय संंविधान निर्माण करीत असताना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.भारत देशांमध्ये विविध जाती,धर्म-पंथाचे  लोक राहतात. या सर्वांना एकत्र जोडण्याचे काम फक्त भारतीय संविधानानेच केले आहे.त्यामुळेच विविध समाजाला गुण्या -गोविंदाने जगण्याची संधी मिळावी म्हणून भारतीय संविधान हे लोकशाही मार्गाने स्वीकारण्यात आले. त्याअनुषंगाने संविधान दिनानिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आबंडेकर  यांच्या प्रतिमेचे पुजन कार्यशाळेचे अधीक्षक श्री.देवेंद्र भंडारे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यशाळेचे निर्देशक श्री. रामचंद्र कुलकर्णी सर व इतर शिक्षक वृंद उपस्थितहोते. श्री. कुलकर्णी सरांनी भारतीय संविधाचे महत्त्व सांगितले तसेच २६/११ या दिवशी  मुंबई या ठिकाणी जो भ्याड ह...