Posts

Showing posts from November, 2021

एन.ए.बी निवासी अंध कार्यशाळा,सोलापूरमध्ये संविधान दिन साजरा.

Image
एन.ए.बी निवासी अंध कार्यशाळा,सोलापूरमध्ये संविधान दिन साजरा करताना सर्व  शिक्षक वृंद व कर्मचारी... (प्रतिनिधी-सोलापूर) नॅब संचलित  एन.ए.बी निवासी अंधकार्यशाळा येथे संविधान दिन करण्यात आला. तसेच २६/११च्या भ्याड मुंबई हल्लात शहीद झालेल्या आपल्या सर्व जवानांना  आदरांजली वाहण्यात आली. भारतीय संंविधान निर्माण करीत असताना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.भारत देशांमध्ये विविध जाती,धर्म-पंथाचे  लोक राहतात. या सर्वांना एकत्र जोडण्याचे काम फक्त भारतीय संविधानानेच केले आहे.त्यामुळेच विविध समाजाला गुण्या -गोविंदाने जगण्याची संधी मिळावी म्हणून भारतीय संविधान हे लोकशाही मार्गाने स्वीकारण्यात आले. त्याअनुषंगाने संविधान दिनानिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आबंडेकर  यांच्या प्रतिमेचे पुजन कार्यशाळेचे अधीक्षक श्री.देवेंद्र भंडारे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यशाळेचे निर्देशक श्री. रामचंद्र कुलकर्णी सर व इतर शिक्षक वृंद उपस्थितहोते. श्री. कुलकर्णी सरांनी भारतीय संविधाचे महत्त्व सांगितले तसेच २६/११ या दिवशी  मुंबई या ठिकाणी जो भ्याड ह...